बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 मे 2023 (13:18 IST)

बिहारमध्ये नोटा लुटण्यासाठी लोकांनी कालव्यात उडी घेतली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

social media
Bihar news :  बिहारच्या सासाराममधील लोकांनी मुरादाबाद कालव्यामध्ये नोटांची बंडले पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झाले. काही वेळातच या नोटा लुटण्यासाठी गर्दी झाली आणि मोठ्या संख्येने लोकांनी त्या घेण्यासाठी कालव्यात उड्या घेतल्या. बहुतेक नोटा 10 आणि 100 रुपयांच्या असल्याचं सांगण्यात येत आहे. नोटा लुटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहाटे लोकांनी चलनी नोटांचे बंडले पाण्यात तरंगताना पाहिले. काही लोकांनी पाण्यात उतरून नोटांचे बंडल लुटण्यास सुरुवात केली. त्यांना पाहताच इतर लोकही पाण्यात उतरले. काही वेळातच नोटा लुटण्याची स्पर्धा लागली. काही नोटा काढत होते तर काही सुकवण्याचा प्रयत्न करत होते.