बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 जुलै 2022 (17:42 IST)

चंद्रपुरात जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंट करणे महागात पडले

सध्या राज्यात सर्वत्र पावसाने झोडपले आहे. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती बनली आहे. नद्यांना पूर आलं आहे. राज्यातील काही भागातील गाव देखील पाण्याच्या पुरात बुडाले आहे. रस्ते , पादचारी मार्ग गाव पाण्याखाली गेले आहे. नद्या ओसंडून वाहत आहे. या पुराच्या पाण्यात काही लोक आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात आणि प्राणाला मुकतात. चंद्रपुरात देखील चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 ठप्प झाला आहे.

अंधारी नदीच्या पुरामुळे चिचपल्ली गावाजवळ महमार्गावर पुराचे पाणी आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हा महाराष्ट्रातून छत्तीसगडला जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. चंद्रपुरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात सर्वदूर बरसणाऱ्या पावसाने शेतकरी व नदीकाठच्या वसाहतीत राहणारे नागरिक धास्तावले आहेत. सतत बरसणाऱ्या पावसाने शहरालगतच्या इरई धरणाची 2 दारे 0.25 मीटरने उघडली आहेत. चंद्रपुरात पोलीस सुरक्षेसाठी पुलाजवळ ठेवण्यात आलेत. पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नका, असं आवाहन करत आहेत. पण, काही जण धोका पत्करून पूर ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अशाच एक पूर ओलांडणाऱ्याला पोलिसांनी बदडून काढले आहे. 
 
सध्या चंद्रपुरात अंधारी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाले आहे. या महामार्गावर दोन्हीबाजूला कोणी पूल ओलांडू नये या साठी पोलीस लागले आहे. पोलीस बंदोबस्त असताना देखील एकाने पूल पार करण्याची हिम्मत केली आणि स्टंटबाजी करत पुलाला पार करत दुसऱ्या टोकावर पोहोचला. त्याला पोलिसांनी अडवल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर पोलिसांनी त्याला दांडुकाने चांगलेच बदडून काढले. आपले जीव धोक्यात घालू नये पुरत पुलाला पार करू नये वारंवार असे सांगून देखील काही जण पूल ओलांडत आहे. पुरात पूल पार करणाऱ्याला पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. जीव धोक्यात घालत पूल पार करण्याचे स्टंट करणे या इसमाला महागातच पडले.