रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (08:17 IST)

चंद्रपूर पेपरमिल उद्योग समूहाच्या कळमना डेपोला भीषण आग,50 कोटींचा चुराडा

चंद्रपूर पेपरमिल उद्योग समूहाच्या कळमना डेपो ला रविवार दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल 24 तासांनंतर आग्नीतांडव थांबण्यात यश, 50 कोटींचा चुराडा लाकूड, बांबू जळून स्वाह; शर्तीचे प्रयत्न आगीवर नियंत्रण नाही, वसाहती सुरक्षित...! या आगीत 4 वेगवेगळ्या डेपोपैकी 3 डेपो जळून खाक झाले. तसेच पेट्रोल पंप आणि बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय आणि वाहने या अग्नितांडवात जळून खाक झाली. तब्बल २४ तासांच्या प्रयत्नानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास आग विझली. मात्र, उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे पुन्हा आग लागू नये म्हणून पाण्याचा मारा करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. आता आग कशामुळे लागली, हे शोधले जात आहे.

तर दुसरीकडे लागलेली आगीचे कारण आणि कामात कुठेतरी अक्ष्यम हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत. याची रीतसर चौकशी करण्याची मागणी माझी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. रविवार दुपारी 2 वाजताच्या सुमारास लागलेली आग आज सोमवार दुपारी 2 च्या सुमारास आटोक्यात आली. ही आग आटोक्यात येण्यासाठी तब्बल वाजता 24 तास लोटले. तूर्तास ही आग जरी ओसरली असली तरी मात्र, पुन्हा आगीचा भडका होऊ नये.
 
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयातील विविध उद्योग समूह आणि अग्निशमन दलाच्या 25 टँकर'च्या जवळपास 300 हून अधिक फेऱ्या झाल्या आहे. हे काम मंगळवापर्यंत सुरू राहणार आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, तहसीलदार, पोलिस निरीक्षक उमेश पाटील, उद्योग समूहाचे व्यवस्थापक उदय कुकडे उपस्थिती होती.

स्थानिक गावकऱ्यांच्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास कळमना परिसरात जंगलातील पाला पाचोळा जाळण्यासाठी वनविभागातील कर्मचाऱ्यांनी ही आग लावली. मात्र, उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग डेपो पर्यंत पोहचली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी गावकरी सांगतात.