1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 24 मे 2022 (11:54 IST)

मुंबईसह राज्यातील 14 नगरपालिकांच्या महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

state election commission
राज्य निवडणूक आयोगानं मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई महापालिकेसह 14 महापालिकांसाठी ही आरक्षण सोडत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील  निर्णयानंतर आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेसाठी येत्या31 मे 2022 रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. अनुसुचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट-ड (मराठी)व परिशिष्ट-इ इंग्रजीमधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. त्याआधी स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी 27 मेपर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31 मे तारीख देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेसाठी कसा असेल कार्यक्रम?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीसंदर्भातील पहिली नोटीस 27 मे रोजी प्रसिद्ध होईल. 31 मे रोजी अनुसूचित जाती (महिला) आणि अनुसूचित जमाती (महिला) 1आणि सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढली जाईल. ही आरक्षण सोडत 1 जून रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन हरकती मागवल्या जातील. आरक्षण सोडतीवरील हरकती आणि सूचना 1 ते 6 जून दरम्यान स्वीकारल्या जातील. अंतिम आरक्षण सोडत १३ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.