राजकोटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी मंत्र्यांसह आरती केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे लोकार्पण केले.
मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज, 11 मे 2025 करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार निलेश राणे कार्यक्रमास उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यासाठी जमलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत शिवआरती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
जगविख्यात शिल्पकार आणि पदमश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 83 फूट उंच पुतळ्याची उभारणी केली.
या पुतळ्याची उभारण्याच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
गेल्या वर्षी शिवरायांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळे कोसळला होता. या वरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या घडलेल्या प्रकाराबद्दल पंतप्रधानांनी जाहीरपणे माफी मागितली होती
.
आता या नव्या पुतळ्याची उभारणी महत्त्वाची ठरत आहे. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. त्याच स्वाभिमानाने हा पुतळा उभा राहिला आहे विक्रमी वेळेत पुतळा स्थापित करण्याचा निर्धार केला होता जे पूर्ण झाले आहे.
आज या पुतळ्याची पूजा मी केली आहे. या साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन. या पुतळ्याची रचना भक्कम असून या वर नैसर्गिक आपत्तीचा काहीच परिणाम होणार नाही. हा पुतळा 93 फूट उंचीचा असून त्यावर 10 फूट उंचीचा चौथरा आहे. एकूण हा पुतळा 103 फूट उंची आहे. हा पुतळा देशातील सर्वांत उंच पुतळा आहे.
Edited By - Priya Dixit