रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (15:19 IST)

साताऱ्यात धबध्याब्यात मुलीला सेल्फी काढणे महागात पडले, 100 फूट खाली कोसळली,रेस्क्यू करून वाचवले

सध्या वर्षाविहारचा आनंद घेण्यासाठी लोक बाहेर पडतात आणि पाण्याच्या ठिकाणी जातात. आणि धबधब्याच्या पाण्यात फोटो काढतात. फोटो आणि रिल्सच्या नादात येऊन अनेक अपघात घडतात. तरीही लोकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. 

साताऱ्यात बोरणेघाटात  धबधबा पाहण्यासाठी आलेली मुलगी सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात 100 फूट खाली कोसळली. लोकांना माहिती मिळाल्यावर तातडीनं तिला वाचवण्यासाठी होमगार्डांने बचावकार्य सुरु केले. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर दोरीच्या साहाय्याने मुलीला वाचवण्यात यश मिळाले. तिला किरकोळ दुखापत झाली आहे.  
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये मुलीला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. 
 
शनिवारी पुण्यातील काही लोक ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी गेले होते. बोरणे घाटात सेल्फी काढताना ही तरुणी 100 फूट खोल दरीत कोसळली. ही तरुणी वर्षाविहाराच्या आनंद घेण्यासाठी धबधबा पाहण्यासाठी आली होती. 

सध्या सातारा पश्चिम मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात अनेक ठिकाणी पर्यटनस्थळे बंद असताना ही उत्साही पर्यटक या ठिकाणी जातात आणि असे अपघात घडतात. 
 
Edited by - Priya Dixit