शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (15:24 IST)

केतकीच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत, म्हणाले...

उस्मानाबाद अभिनेत्री केतकी चितळे हिच्या सोशल मीडियावरील  वादग्रस्त पोस्टनंतर तिच्यावर सर्वत्र टीका होत आहे. शरद पवार यांना उद्देशून शेअर केलेल्या मजकूरवरुन तिच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत केतकीच्या समर्थनार्थ पुढे आले आहे. केतकी चितळेचा मला अभिमान आहे, तिला समर्थनाची गरज
 
शरद पवार यांच्यावर वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेच आमदार सदाभाऊ भाऊ खोत यांनी समर्थन केल आहे. शरद पवार यांच्याबद्दल पोस्ट केल्यानंतर केतकीला अटक झाली. परंतु दुसरीकडे सदाभाऊ खोत हे केतकीच्या पाठिशी उभे आहेत
 
उस्मानाबादमध्ये तुळचा भवानीचे दर्शन घेतल्यानंतर सदाभाऊ खोत म्हणाले की, केतकी चितळेचा मला अभिमान आहे. ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही. तिचे धैर्य मानावे लागेल. न्यायालयात तिने स्व:ताची बाजू स्व:ता मांडली.
 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल ही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारला आहे.