शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (11:52 IST)

राज्यात आता रेशन दुकानात धान्यच नाही ,तर अनेक वस्तू मिळतील

In the state
राज्यातील सरकारी रेशन दुकानांमध्ये ग्राहकांना आता आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी साबण, हँडवॉश, डिटर्जंट पावडर, शाम्पू, कॉफी आणि चहापत्तनी खरेदी करता येणार आहेत. साबण, हँडवॉश, लॉन्ड्री पावडर, शाम्पू, कॉफी यासारख्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी राज्य सरकारने रेशन दुकानांना मान्यता दिली आहे. बुधवारी राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचा आदेश जारी केला.
त्यानुसार शासनाने रेशन दुकानांना सदर वस्तू तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात येणार आहेत. रेशन दुकानांना विक्री आणि दुकानांपर्यंत पोहोचून मिळणाऱ्या कमिशनबाबत थेट संबंधित वितरक कंपनीशी संपर्क साधावा लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. हा व्यवहार संबंधित कंपनी आणि त्यांचे घाऊक आणि किरकोळ वितरक आणि रेशन दुकान यांच्यात असेल. यामध्ये सरकारचा कोणताही सहभाग आणि हस्तक्षेप असणार नाही.