मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (08:59 IST)

राज्यात ९६३ नवीन कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाचा संसर्ग खालावताना दिसत आहे. दररोज येणार्या आकडेवारीत रुग्णसंख्या घटत आहे, तर मृतांची संख्याही खालावत आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे.
राज्यात शुक्रवारी  ९६३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२७,८३८ झाली आहे. राज्यात ९७२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण ६४,७१,७६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६५ टक्के एवढे झाले आहे. याशिवाय, २४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत १४०६९२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.राज्यात एकूण ११,७३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.