सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (08:43 IST)

बाप्परे, लसीकरणानंतरही १२ हजारांहून अधिक पुणेकरांना कोरोना लागण

पुणे शहरात लसीकरणानंतरही नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही १२ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोना  झाला असून आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाल्याने लसीकरणानंतरही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
 
पुणे शहरात मागीलवर्षी ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत ५ लाख ५ हजार ७०५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ९ हजार ९० जणांचा मृत्यूदेखिल झाला आहे. यावर्षी १६ जानेवारीपासून पुण्यासह संपुर्ण देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची आणि मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत ५१ लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी ३१ लाख ९८ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून १९ लाख नागरिकांनी दोन्हीही डोस घेतले आहेत. पुण्या पहिला डोस घेतलेल ५ हजार ६२१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३३ जणांचा मृत्यू देखिल झाला आहे. तसेच दोन्ही डोस घेतलेले ६ हजार ६८१ जणांनाही कोरोना झाला असून यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे.