मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (08:44 IST)

म्हणून राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार

राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी एक महत्वाची घोषणा केली. मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळेच या भागांमध्ये लस घेण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. म्हणूनच आता राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे. सलमानच्या मदतीने या मुस्लीम बहुल परिसरांमध्ये जनजागृती करुन येथील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा सरकारचा विचार आहे. करोना लसीकरण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. मात्र काही भागांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
 
जालन्यामध्ये सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे यांनी, “मुस्लीम बहुल परिसरामध्ये अजूनही लसीबद्दल शंका आहे. आम्ही यासाठी आता सलमान खान आणि धर्मगुरुंची मदत घेणार असून मुस्लीम समाजातील सदस्यांनी लसीकरण करुन घेण्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत,” असं टोपे म्हणाले. धर्मगुरु आणि कलाकार यांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच त्याचं म्हणणं लोक ऐकतील असा विश्वास टोपेंनी व्यक्त केलाय. सलमान खानचा मोठा चाहता वर्ग असून महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे असंही टोपे म्हणाले.