1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (08:30 IST)

क्रांती रेडकरकडून समीर वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे गेल्या महिनाभरापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे असा मलिकांनी केला. या आरोपाला चोख उत्तर देत समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर  समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचं ज्ञानदेव हे नाव अधोरेखित केले आहे.  
 
नुकतेच मुंबई एनसीबीने गुप्त माहितीच्याआधारे नांदेड जिल्ह्यात तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ जणांना अटक केली. यानंतर एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने या कारवाईनंतर चोख प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर यांनी वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, असे ट्विट पोस्ट केलं आहे.