बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (08:34 IST)

शरद पवार यांनी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या कामाचे केले कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक करत, त्यांची जाहीर प्रशंसा केली आहे. नागपुर येथे व्यापारी संघटनांकडून आयोजित करण्यात आलेल्या एक कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 
 
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना शरद पवार म्हणाले, “आज देशात मी संसदेत बसतो, त्या संसदेत एखाद्या राजकीय पक्षाच्या खासदाराची कोणतीही योग्य समस्या असेल, तेथील लोकांची समस्या असेल आणि ती सोडवण्याचा अधिकार कोणत्या मंत्र्याकडे असेल तर त्वरीत यामध्ये लक्ष घालून, समस्या सोडवणारे एकमेव मंत्री आहेत, ज्यांचं नाव नितीन गडकरी आहे. हे मी पाहतोय अनेकजण पाहत आहेत. एक विकासाचा दृष्टिकोन नेहमी त्यांचा असतो. विकासाला पाठिंबा देण्याची त्यांची निती असते. ते कधी पाहत नाही की हे राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत किंवा भाजपाचे किंवा आणखी कुठले आहेत. त्या भागातील समस्या ही महत्वाचं समजातात आणि ती दुरूस्त करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. तर मला काहीना काही पावलं उचलण्याचं गरज आहे हे लक्षात घेऊन ते काम करतात. अशाचप्रकारे बाकी सर्व सहकाऱ्यांनी जर काम केलं तर मला वाटतं तुम्ही ज्या समस्या मांडल्या त्यापैकी अनेक समस्यांवर या अगोदरच तोडगा निघाला असता.”
 
पवारांनी बोलतांना सांगितले की, व्यापाऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी दूर होऊ शकता, त्यासाठी त्यांना एकदा मुंबईत येऊन भेटावे लागेल. पण अडचणी लगेच दूर करण्यासाठी मंत्र्याकडे जावे लागते आणि तुमच्या शहारत एक मंत्री आहे जे तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतात ते म्हणजे नितीन गडकरी.