मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (08:37 IST)

संजय राऊत यांनी घेतली राज यांची भेट

शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही भेट राजकीय कारणांसाठी नव्हती तर अत्यंत खासगी आणि खास कारणासाठी होती.
 
संजय राऊत हे सपत्नीक राज यांच्या नव्या घरी ‘शिवतीर्थ’ला भेटीसाठी गेले होते. सुमारे अर्धा तास ही भेट झाली. मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत राज यांच्या घरी गेले होते. या खासगी भेटीनंतर राऊत राज यांच्या घराबाहेर पडले तेव्हा राज आणि शर्मिला ठाकरे हे त्यांना अगदी गाडीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.