गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (14:56 IST)

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपचा हात संजय राऊतांचे आरोप

BJP alleges Sanjay Raut's involvement in ST workers' strike एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपचा हात संजय राऊतांचे आरोप Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
शिवसेनेचे खास दार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप लावले आहे  की एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या आंदोलनामागे भाजपचा मोठा हात आहे .त्यांच्या या विधानाला मान्य करत चंद्रकांत पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करत त्यांनी हे विधान केले की  सर्व एसटी कर्मचारी संघटना बरखास्त झाल्यावर त्याची सर्व सूत्र आणि आंदोलनाचं नेतृत्व भापच्या हाती आली .होय, कुठल्याही अन्यायाच्या विरोधात भाजप नेहमीच हात आणि साथ देणार .आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आहोत .असं ही त्यांनी मान्य केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर आता काहीतरी निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती भीषण आहे . एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांचे सर्व संघटन बरखास्त झाले आहे. त्यांची स्थिती अवघड आहे. त्यामुळे त्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपकडे आलं. अन्यायाच्या विरोधात हात उचलणार्याच्या  बरोबर आमचा हात असणार .असे ही त्यांनी म्हटले.