गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (10:26 IST)

आधी कोठडीतले जेवण घ्या- न्यायालय

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले आहे. आपल्याला घरचे जेवण देण्यात यावे अशी मागणी अनिल देशमुख यांनी केले होते.
 
त्यावर 'आधी कोठडीतले जेवण घ्या' अशा शब्दांमध्ये न्यायालयाने त्यांना फटकारले असून त्यांची मागणी फेटाळली आहे.
ईडीची कोठडी संपल्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात पुन्हा उभं करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची कोठडी सुनावली.
 
प्रकृतीचं कारण देत देशमुख यांनी घरच्या जेवणाची मागणी केली होती. 'तेव्हा आधी तुरुंगातलं जेवण घ्या, योग्य वाटलं नाही तर विचार करू' असं न्यायालयानं त्यांना सांगितलं. मात्र तुरुंगात वेगळा बेड देण्याची त्यांची मागणी मान्य करण्यात आली.