सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (09:53 IST)

Road Accident : शाळेची व्हॅन कोसळली 11 विद्यार्थी जखमी

सांगलीतील आष्टा येथे आष्टा- मर्दवाडी महामार्गावर सोमवारी सकाळी शाळेची व्हॅन कॅनाल मध्ये कोसळून 11 विद्यार्थी जखमी  झाले . या अपघातात व्हेन  चालकासह साहाय्यक महिला देखील जखमी झाले. मिरजवेस कडून पिवळी टाटा मॅजिक स्कुल व्हॅन भरधाव वेगाने येत असताना पुलाच्या दगडाला धडकून कॅनालमध्ये कोसळली. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांनी व्हॅन मधून बाहेर काढले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.  व्हॅन मधील सहाय्यक महिला वैशाली यांच्या हाताला आणि पायाला मुका मार लागला . व्हॅन वेगाने चालवण्यासाठी व्हॅन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस  तपास करत आहे .