बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (12:39 IST)

अक्कलकोटहून सोलापूर जाणाऱ्या जीपचा टायर फुटून अपघात ,5 जणांचा अंत

अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या क्रूझर जीपचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या जीप मध्ये 10 ते 15 प्रवाशी होते .या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले आहे . जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .या मध्ये काही प्रवाशी गंभीर असल्याचे सांगितले जात आहे . मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोटवरून क्रुझर जीप सोलापूरला येत असतांना जीपचा टायर फुटला आणि जीप पालटली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात बसलेल्या  5 जणांचा जागीच दुर्देवी  अंत झाला .
टायर फुटण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.या अपघातानंतर रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध झाली नाही. अपघातात जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले .