शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (14:43 IST)

सलमान खान या प्रकारे करणार ठाकरे सरकारची मदत

महाराष्ट्राच्या मुस्लीम बहुल परिसरामध्ये कोरोना लसीबद्दल शंका असल्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने बॉलीवुड अभिनेता सलमान खानची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की मुस्लिम बहुल भागात अँटी-कोरोनाव्हायरस लस मिळण्यास शंका वाटत आहे आणि सरकार लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे.
 
टोपे म्हणाले की, लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे, मात्र काही भागात लसीकरणाची गती मंद आहे. मुस्लिमबहुल भागात कोरोना लसीबाबत अजूनही संकोच आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाची भीती दूर करण्यासाठी आणि त्यांना लसीकरणासाठी राजी करण्यासाठी सलमान खान आणि धार्मिक नेत्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
टोपे म्हणाले की, धार्मिक नेते आणि चित्रपट कलाकारांचा खूप प्रभाव आहे आणि लोक त्यांचे ऐकतात. महाराष्ट्रात आतापर्यंत 10.25 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. नोव्हेंबरच्या अखेरीस सर्व पात्र व्यक्तींना किमान पहिला डोस देण्याचे लक्ष्य आहे.
 
कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबाबत टोपे म्हणाले की, तज्ज्ञांच्या मते साथीचे चक्र 7 महिन्यांचे असते, मात्र मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे ही कोरोनाची लाट गंभीर होणार नाही.
 
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र हे कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झालेले राज्य आहे. एकूण कोरोनाबाधित आणि मृत्यूची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मात्र, महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने घट झाली आहे.