राज्याचा रिकव्हरी रेट 97.64, तर मृत्यूदर 1.32 टक्के
महाराष्ट्रात 886 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 25 हजार 872 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 69 हजार 739 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.64 टक्के झाला आहे तर, राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, सध्या 11 हजार 847 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 948 बरे झालेल्या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज राज्यात 34 रुग्ण दगावले असून, महाराष्ट्रात आजवर 1 लाख 40 हजार 636 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 41 लाख 55 हजार 107 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 1 हजार 024 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 98 हजार 703 जण होम क्वारंटाईन आहेत.
कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांतील अंतर कमी करावे, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केलीआहे. कोविड लसीकरण जलद गतीने करण्याच्या दृष्टीने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसावरुन 28 दिवसापर्यंत करता येईल का याचा फेरविचार करावा असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे