बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (22:05 IST)

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डावर नाशिकमधील एकमेव वकील

नाशिकचे नामांकित वकील Adv.फज़ल सय्यद यांची महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डच्या लीगल पॅनलवर निवड झाली आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या वक्फ पॅनलवर निवड झालेले नाशिक जिल्ह्यातील ते एकमेव वकील आहेत. नाशिक मधील अनेक वक्फच्या जमिनीचे खटले त्यांनी यशस्वीरीत्या हाताळलेले आहेत.
Adv.फजल सय्यद हे गेल्या 30 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात कार्यरत आहे. वकील व्यवसायात येण्यापूर्वी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली.
Adv.सय्यद यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. यानिमित्ताने नाशिक बार असोसिएशनने त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले आहे. आणि त्यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा निश्चितच वक्फ बोर्डाला होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
 
नियुक्ती नंतर Adv. फजल सय्यद यांची प्रतिक्रिया : गेल्या 30 वर्षांच्या प्रामाणिक मेहनतीचे फळ यानिमित्ताने मिळाले. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून वक्फच्या विल्हेवाट झालेल्या जमिनी वक्फ बोर्डाला मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.