1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (17:33 IST)

देवी आईच्या गावात दारू पाजून अल्पवयीन मुलीवर पोलिसांनी केले अत्याचार

अंबाजोगाई शहरात अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचाराची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. बालविवाह संदर्भात आणि पोक्सो कायदा अंतर्गत आतापर्यंत 15 जणांची चौकशी करण्यात आली असून त्यातील 10 जणांना अटक अथवा ताब्यात घेतले आहे. यामध्ये अंबाजोगाई शहरात राहणाऱ्या एका महिलेला व ग्राहक शोधण्याचं काम करणाऱ्या निलंबित मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे.
13 व्या वर्षीच पीडित अल्पवयीन मुलीचे धारूर तालुक्यातील एका गावातल्या तरुणासोबत लग्न लावून दिले गेले होते. या पीडितेचा पती एका ढाब्यावर काम करायचा आणि आठवड्यातून दोन-तीन दिवस घरी येत असे. तेव्हा तो मुलीला मारहाण करायचा म्हणून छळामुळे वैतागून ती आपल्या माहेरी वडिलांकडे आली असताना जन्मदात्यानेच तिच्या अब्रूवर हात टाकला. या अत्याचाराविरोधात तिने पोलीस ठाणे गाठले पण तेथेही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. पोलिसांकडे तक्रार करायला निघाली म्हणून घरात पीडितेला विस्तवाचे चटके देण्यात आले. या छळाला कंटाळून तिने घरातूनही पळ काढला आणि अंबाजोगाई शहरात आली. मात्र, तिथेही तिला दु:ख सहन करावे लागले. अनेकांनी पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. 
 
या पीडित अल्पवयीन मुलीने अत्याचाराला विरोध केला तर काहींना तिला जबर मारहाण देखील केली. कोणी पीडितेला दारू पाजून तर कोणी जेवायला देतो म्हणून अत्याचार केला. काहींनी तिच्याकडून वेश्याव्यवसाय ही करून घेतला. अत्याचार करणारे नराधमांनी पीडितेबाबत अनेकांना माहिती दिली आणि वेश्यावृत्तीला भाग पाडले.
 
आपल्यावर होणार्‍या अत्याचाराची ही माहिती या पीडितेने बालकल्याण समितीसमोर सांगितली असून तिने सांगितले की आपण ज्यांच्याकडे संरक्षणाची आस ठेवतो त्या दोन पोलिसांनी देखील तिच्यावर अत्याचार केला. एका पोलिसाने लॉजवर तर दुसऱ्याने त्याच्या घरी नेऊन अत्याचार केला. या पीडितेला अत्याचार केलेल्या पोलिसांची नावे ठाऊक नाहीत. या दोन पोलिसापैकी एकाने तिला अंबाजोगाईजवळच्या एका कला केंद्रावर सोडून तिला तिथे नाचकाम करायला लावले. 
 
दरम्यान या प्रकरणात अंबाजोगाई न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत या प्रकरणात आरोप झालेले पोलीस कर्मचारी अद्यापही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना का सापडत नाहीत अशी विचारणा केली आहे. 
 
या पीडित मुलीने सुरुवातीला दिलेल्या माहितीप्रमाणे अंबाजोगाई पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रोज नवीन गोष्टींचा खुलासा होत आहे.