रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (12:09 IST)

400 जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी 20 आठवड्याची गर्भवती

गेल्या सहा महिन्यांच्या काळात पीडित मुलीवर 400 पेक्षा जास्त लोकांनी अत्याचार केले आहेत, ज्यात एका पोलिसाचाही समावेश असल्याची माहीती देण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी 20 आठवड्याची गर्भवती राहिल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
सामाजिक कार्यकर्ते आणि बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशिल कांबळे यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरुन हा गंभीर प्रकार उघडकीस आला. 
 
पीडित मुलीची आई ती लहान असतानाच वारली. पीडित मुलगी सातवीपर्यंत शिकलेली असून वसती गृहात राहत असताना वडील तिला गावी घेऊन गेले. नंतर लगेच ती 13 वर्षांनी असताना बळजबरीने तिचं लग्न लावून दिलं. सासरी नवर्‍याने संभाळया नकार दिल्यामुळे ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे रहायला आली. परंतू वडिलांनी देखील तिला संभाळण्यासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत त्या मुलीला अंबाजोगाई येथील बसस्थानकांवर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले.  पीडितेने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
 
तिने सांगितले की, माझ्यावर अनेकांनी अत्याचार केला. याबाबत ती तक्रार घेवून अंबाजोगाई येथील पोलिस ठाण्यात अनेकवेळा गेले मात्र तेथून तिला हूसकावून लावण्यात आले. तिने घटना सांगितल्यावरही दोषींवर कारवाई केली गेली नाही. एवढेच नाही तर एका पोलिस कर्मचार्‍याने देखील माझ्यावर अत्याचार केला आहे.असे त्या पिडीत अल्पवयीन मुलीने जबाबात म्हटले आहे.
 
यापूर्वीच 9 नोव्हेंबर ला बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या पतीसह वडिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.