शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (11:37 IST)

कंगनाचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं, पण मोदी सरकारबाबतची भावना काही अंशी बरोबर - चंद्रकांत पाटील

'देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले' असे वाद्गग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने केलं होतं.
 
तिच्या वक्तव्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असताना आहेत. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "कंगना राणावतच्या भावना नेमक्या काय आहेत मला माहीत नाही. पण तिचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर नकारात्मक टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही."
"पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे मोदी सरकारबाबत तिची भावना काही अंशी बरोबरही आहे," असं पाटील यावेळी म्हणाले.