गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (10:35 IST)

74 वर्षीय महिलेवर घरात घुसून मारहाण करत बलात्कार

74-year-old woman raped in Ahmednagar
एका धक्कादायक घटनेत एक आरोपी पीडित महिला घरात एकटी असताना घरात घुसला आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने पीडितेला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.
 
माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरात घडली. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  आरोपीने पीडित महिला घरात एकटी असताना घरात घुसून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्याने पीडितेला मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.