बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (10:08 IST)

एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे-शरद पवार यांच्यात चर्चा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्हे दिसत नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे यांसंदर्भात मैदानात उतरल्याचं शुक्रवारी (12 नोव्हेंबर) दिसून आलं.
एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या होत्या.
 
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
 
शुक्रवारी ठाकरे हे पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले.
 
त्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास तासभर महत्वपूर्ण चर्चा झाल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.