शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (11:16 IST)

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर बीड मध्ये 400 जणांकडून बलात्कार

मुली या देवीचे रूप आहे.हे आता फक्त म्हणण्यापुरतीच राहिले आहे.अलीकडील मुलींवर होत असलेले अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता मुलीच्या सुरक्षेतवर प्रश्नचिन्हच उठत आहे. मागे एका अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी बलात्कार केल्याच्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून टाकले होते. आता बीडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी  बलात्कार केल्याचे हादरवून टाकणारे वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे बीड मध्ये खळबळ उडाली आहे. बीड च्या अंबेजोगाई येथील एका असहाय अल्पवयीन मुलीचे फायदा घेत गेल्या सहा महिन्यापासून तब्बल 400 लोकांनी शारीरिक शोषण केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या 400 जणांमध्ये एका पोलीस कमर्चाऱ्याचाही समावेश आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी अल्पवयीन असून तिच्या वडिलांनी तिचा बाल विवाह केला होता. तिच्या वडिलांनी तिचे लग्न एका तरुणाशी लावून दिले. नंतर सासरी तिचा सांभाळ नवऱ्याने करण्यास नकार दिल्याने ती सासरहून माहेरी आली. वडिलांनी देखील मी तुला सांभाळणार नाही, परत सासरी जा म्हणून घराबाहेर काढले. त्यामुळे ती एकटी पडली आणि अंबाजोगाई बस स्थानकावर येऊन बसली .तिला एकटीला बघून तिचा फायदा घेत तब्बल 400 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना बालहक्क कार्यकर्त्याच्या सजगतेमुळे उघडकीस आली. या घटनेची सुनावणी बालकल्याण समिती समोर आल्यामुळे हा सर्व प्रकार समजला. या घटनेमुळे बीड हादरले आहे. ही घटना अमानुषतेचा कळस आहे. या प्रकरणी वडिलांवर आणि इतर नातेवाकांवर बाल विवाह करून दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपासकरत आहे. या मध्ये सामील असणाऱ्या तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे