शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (07:34 IST)

’खुपते तिथे गुप्ते’या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात यांनी मोठे गौप्यस्फोट केले

rane
’खुपते तिथे गुप्ते’या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी नारायण राणे यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडलं, असा दावा नारायण राणेंनी केला आहे.
नेमकं काय नारायण राणे?
 
“मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडलं. पण, दोनदा बाळासाहेब ठाकरेंना तयार करून मी उद्धव ठाकरेंना आणलं. बाळासाहेब ठाकरेंना एकच धमकी असायची, घर सोडण्याची,” असं नारायण राणेंनी सांगितलं.
 
यावेळी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यात संजय राऊत म्हणतात की, ‘नारायण राणे फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचा पुढचा विचार न करता. आता फक्त एवढंच सांगायचं बाकी आहे, की बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना प्रमुख म्हणून मी नेमलं.’
Edited by : Ratnadeep Ranshoor