शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (09:08 IST)

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीवर चौधरींऐवजी भुसे आणि सामंतांचा समावेश

dada bhuse
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीवर शिंदे गटाच्या आमदारांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, मुंबई –पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची )बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या सदस्याला समाविष्ट करून घेण्याकरता अजय चौधरी  यांनी काल, ९ ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेची ही मागणी फेटाळली आहे. दरम्यान, या बैठकीत शिंदे गटाकडून दादा भुसे आणि उदय सामंत  यांना समाविष्ट करून ठाकरेंना धक्का दिला आहे.
 
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाआधी विधिमंडळाची कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत सर्व पक्षातील एक सदस्य घेतला जातो. त्यासाठी या समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाच्या गटनेत्यांना सचिवांकडून पाठवण्यात आलं होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तसे कोणतेही पत्र मिळाले नाही.