1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Income tax red in nasik

आयकर विभागाची कारवाई दोघे तब्यात तर ८ लाख जप्त

नाशिक– नाशिक येथील आग्रा-मुंबई रस्त्यावरील एका मोठ्या हॉटेलात आयकर खात्याकडून तपासणी करण्यात आली आहे. आयकर विभागाने यामध्ये २ संशयितांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली आहे असे सुत्रांकडून माहिती मिळत आहे. हे दोघे अनेकांना त्यांच्या जुण्या नोटा बदलवून देत होते असे समोर आले आहे.
 
या संपूर्ण कारवाईत ८ लाखाच्या नोटा आयकर विभागाकडून जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात ज्या दोन लोकांची चौकशी करण्यात आली ते दोघेही नाशिक शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघांपैकी एक धर्मसंस्थेचे महंत आहेत तर दुसरा एका आक्रमक संघटनेचा पदाधिकारी असल्याची सुत्रांनी माहिती दिली. या संपूर्ण चौकशीत अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली आहे. अजूनही चौकशी सुरु असल्याचे समजते आहे.
पुढील लेख
देवेंद्र भुजबळ यांना बिझनेस एक्सप्रेस श्री पुरस्कार प्रदान