शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आता पेट्रोलवर कॅशलेस खरेदीवर सुट

पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास आज मध्यरात्रीपासून 0.75% सूट मिळणार आहे. मोबाईल वॉलेट किंवा कार्ड पेमेंट केल्यास डिस्काऊंटचे पैसे पुढील तीन दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. एक लाख गावांना 10 हजार लोकसंख्या असलेल्या ऑनलाईन व्यवहारांसाठी प्रत्येक 2 स्वाईप मशिन्स मोफत दिल्या जाणार आहेत.नाबार्डच्या माध्यमातून 4.32 कोटी शेतकऱ्यांना रुपे कार्ड देणार. सगळे व्यवहार कार्डवरुन करण्याची मुभा असेल.उपनगरी रेल्वेचे मासिक पास आणि सिझनल तिकिटाची डिजिटल खरेदी केल्यास 0.5 टक्के सूट मिळेल. मुंबईतून 1 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
 
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या पोर्टलवरुन जनरल इन्शुरन्स ऑनलाईन घेतल्यास 10 टक्के, तर लाईफ इन्शुरन्स ऑनलाईन घेतल्यास 8 टक्के सूट मिळेल. नव्याने विमा काढणाऱ्यांसाठीच सूट मिळणार आहे.सरकारी कार्यालयातील कर किंवा अन्य रक्कम भरताना कोणत्याही प्रकरणाचा ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार नाही.