1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. indian army jawan rahul dhage died in railway accident

महाराष्ट्राच्या सुपुत्रावर काळाचा घाला

नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या लेकीला पाहण्यासाठी घरी जात असताना भारतीय सैन्यदलातील एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राहुल ढगे हा दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 20 मार्च 2013 ला महार रेजिमेंटमध्ये सैन्य दलात भरती झाला होता. 
 
दरम्यान, रविवारी रात्री राहुल यांच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला. जालन्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवान राहुल ढगे यांचा मृत्यू झाला. आपल्या नवजात लेकीला पाहण्याच्या ओढीने जवान घाईघाईने आपल्या गावाकडे निघाले होते. मात्र, वाटेतच रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील लेख
'वयाच्या पन्नाशीत दुसरं मूल झालं म्हणून माझ्या आईने लाज का वाटून घ्यावी?'