सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (09:09 IST)

भूषण देसाई यांनी ठाकरे गटाला रामराम का ठोकला?

bhushan desai
भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे देसाई कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे. भूषण देसाई यांनी ठाकरे गटाला रामराम का ठोकला? याबाबत राजकीय वर्तुळ तर्क वितर्क लावले जात आहे. दरम्यान, भूषण देसाई यांनी शिंदे गटात जाण्यामागचं कारण सांगितलं आहे.
 
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भूषण देसाईंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी भूषण देसाई म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरा शब्द माझ्यासमोर आलेला मला आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. ते वाढवत आहेत. यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आधीपासून एकमेकांबरोबर काम केलं आहे. मी एकनाथ शिंदे यांना जवळून काम करताना बघितलं आहे. त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांची निर्णयक्षमता पाहून मी त्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.”