रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (08:03 IST)

नाशिक शहरातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

nashik police
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील 10 पोलीस निरीक्षकांसह 1 महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. याबाबतचा आदेश आज सायंकाळी जारी केला आहे.
यामध्ये पंकज भालेराव यांची नियुक्ती उपनगर वरून सातपूर पोलीस ठाण्याला करण्यात आली आहे. अनिल शिंदे यांची नियुक्ती नाशिक रोड पोलीस ठाण्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. युवराज पत्की यांची नियुक्ती अंबड पोलीस ठाण्यातून मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.

गणेश न्याहदे यांची बदली नाशिक रोड पोलीस ठाण्यावरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुरज बिजली यांची सायबर पोलीस ठाण्यावरून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे. देविदास वांजळे यांची बदली इंदिरानगर पोलीस ठाण्यावरून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. पवन चौधरी यांची बदली अभियोग कक्षा करून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावर करण्यात आली आहे.
 
पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेतून चुंचाळे पोलीस चौकीला करण्यात आलेली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा जाधव यांची बदली नियंत्रण कक्षातून चुंचाळे पोलीस चौकीला करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांची बदली सायबर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. संजय बांबळे यांची बदली इंदिरानगर पोलीस ठाण्यातून विशेष शाखेमध्ये करण्यात आली आहे.
 
चुंचाळे पोलीस चौकीला मिळाला पोलीस निरीक्षक
सातत्याने अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे अशी मागणी केली जात होती. याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या देखील केला जात होत्या. परंतु या बदलांच्या प्रशासकीय कारणांमध्ये चुंचाळे पोलीस चौकीसाठी प्रथमच स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक देण्यात आले आहे. या माध्यमातून भविष्यामध्ये चुंचाळे हे नवीन पोलीस स्टेशन होऊ शकते असे चर्चिले जात आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor