बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (16:17 IST)

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावानी दोघांनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितली

Pune Mayor Murlidhar Mohol
पुण्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून दोघांनी भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी 3 कोटी रूपयांची  खानदानी देण्याची मागणी एका व्यावसायिकाकडे केल्याचे समजले आहे. राजेश व्यास यांनी या प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शेखर ताकवणे आणि संदीप पाटील या दोघांनी आपापल्या मोबाईवर "कॉल मी " नावाचे अँप  डाउनलोड केले त्यात भाजपचे प्रदेश सर चिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल नंबर सेव्ह करून फिर्यादीला असे जाणवून दिले की हा नंबर खरोखरच मुरलीधर मोहोळ यांचा आहे. आरोपींनी खंडणीसाठी मोहोळ यांच्या मावसभावाचा नंबर देखील वापरला. या दोघांनी या अँप ने पुण्यातील एका व्यवसायिकाला फिन करून भारतीय युवा मोर्चाच्या कामाला पैसे लागणार आहे. 3 कोटी रुपये द्या. असे म्हणत खंडणी मागितली. व्यवसायीकाने तातडीने हा सर्व प्रकार बनावट असल्याचे लक्षात येता पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाईल नंबरचा शोध लावत आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. पुढील तपास सुरु आहे. 
 
Edited By- Priya Dixit