मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (08:42 IST)

असे बोलणे योग्य नाही; कुणाल टिळक यांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

chandrakant patil
माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात 20 ते 25 वर्षे काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही, असे प्रत्त्युत्तर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.
 
याबाबत बोलताना टिळक म्हणाले, माझ्या आईने गेली 20-25 वर्षे कसब्यात काम केले. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क दोन वर्षांच्या आजारपणाच्या काळात नक्कीच कमी झाला नव्हता. त्यामुळे कसब्यात सहानुभूतीची एक लाट होती. कसबा पोटनिवडणुकीत भाजप पक्ष मैदानात उतरला, तेव्हा वेगळय़ाप्रकारे झालेले मतदान दिसून आले. 20-25 वर्षांचा जनसंपर्क दोन वर्षांमध्ये कमी होत नसतो. माझी आई आजारी असतानाही कार्यक्रमांना जात होती. तिने कसबा विधानसभा मतदारसंघासाठी निधी आणला होता, विकासकामेही सुरू होती. गिरीश बापट यांच्यानंतर माझ्या आईने कसबा मतदारसंघ बांधून ठेवला होता. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या कार्याचा आदर झाला पाहिजे. माझ्या आईच्या कार्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाही, असेही टिळक यांनी यावेळी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor