1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (08:33 IST)

आरटीई अंतर्गत गतवर्षीपेक्षा 80 हजारांनी अर्जसंख्येत वाढ

Right to Education Act  RTE  शिक्षण हक्क कायदा    increase in the number of applications  applications is approximately more than 80 thousand
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये राखीव 25 टक्के जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन लाख 66 हजार 548 पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या साधारण 80 हजारांपेक्षा अधिक असून आता पालकांचे लक्ष प्रवेशाच्या सोडतीकडे लागले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जसंख्या वाढल्याने प्रवेश प्रक्रियेत चुरस होणार असल्याचे दिसून येत आहे.
 
आरटीईअंतर्गत आर्थिक आणि वंचित घटकांतील मुलांचे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत संपली असून, राज्यातील आठ हजार 828 शाळांमधील एक लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 66 हजार 548 पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध जागांच्या साडेतीन पटपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जांची पडताळणी होऊन साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात ‘एनआयसी’मार्फत प्रवेशाची सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पालकांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मुलाच्या प्रवेशाबाबत मेसेज पाठविण्यात येईल. त्याचप्रमाणे पालक आपल्या अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड टाकूनही मुलाच्या प्रवेशाची स्थिती जाणून घेऊ शकतात. प्रवेश जाहीर झालेल्या मुलांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.

Edited By - Ratnadeep ranshoor