शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (11:46 IST)

'कोव्हिडचा कहर आहे आणि महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्देव'- संजय राऊत

संपूर्ण देशात कोरोनाविषयक आणीबाणी आहे. भीती कोरोना विषाणूची नसून लॉकडाऊन नावाच्या सैतानाची आहे. संपूर्ण देशात कोव्हिडचा कहर आहे आणि महाराष्ट्र त्यात पुढे आहे हे दुर्देव 
"लॉकडाऊन लागला तर उद्योग व्यापार कोसळून पडण्याची भीती आहे. कोरोना कुणालाच सोडत नाही. लोकांना टाळेबंदी हे नको हे मान्य पण कोरोनाला कसं थोपवायचं? स्वत:वर निर्बंध घालून शिस्त पाळायला कोणीच तयार नाही.
"मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष आता काय करणार आहे? असा सवाल राऊत यांनी केला. विरोधासाठी विरोध करत असताना आपण जनतेच्या जीवाशी व राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही. राज्याच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते योग्य आहे असं विरोधी पक्षाने सांगायला हवं होतं. त्यात सगळ्याचं हित होतं," असं राऊत म्हणाले.