मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (21:24 IST)

जगदंबा तलवार भारतात लवकरच येणार, मुनगंटीवार यांची घोषणा

sudhir munguttiwar
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि सध्या इंग्लडमध्ये असणारी जगदंबा तलवार भारतात लवकरच येणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवप्रताप दिनानिमित्त मोठी घोषणा करण्यात आली आहे. 
 
सन १८७५ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची जदगंबा तलवार ब्रिटनला नेण्यात आली होती. ती तलवार पुन्हा भारतात यावी याकरता बरेच प्रयत्न केले गेले. मात्र, प्रयत्नांना यश आले नाही. अखेर शिंदे फडणवीस सरकारने ही तलवार पुन्हा भारतात यावी याकरता हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. २०२४ पर्यंत ही तलवार राज्यात येईल अशी अपेक्षा असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ही तलवार इंग्लडच्या ताब्यात आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक इंग्लडचे पंतप्रदान झाल्याने ही तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार १८७५ साली छत्रपती चौथे महाराज यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या प्रिन्सला भेट म्हणून दिली होती. कोल्हापूरच्या शिलालेखात याची नोंद आहे. ही तलवार पुन्हा महाराष्ट्रात यावी याकरता १९०० पासून प्रयत्न सुरू आहेत. ही तलवार सध्या इंग्लड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor