शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (19:38 IST)

शिवसेनेच्या महिला नेत्यावर हल्ला

crime
वाशिम महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला झाला आहे. शहरातील ग्रामीण पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भर रस्त्यावर हा प्रकार घडला. त्या आपल्या मैत्रिणीसह बाजारात जात असताना ही घटना घडली. पौळकर यांच्यावर चाकूने दहा ते पंधरा वेळा वार करण्यात आले असून या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पुढील तपास वाशीम शहर पोलीस करीत आहेत.
Edited by : Smita Joshi