1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (12:38 IST)

जळगांव हादरलं : नातलगानेच 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला

Jalgaon shakes: 4 year old girl was raped by her cousin Maharashtra News Regional Marathi  News In Webdunia Marathi
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एका चार वर्षाच्या चिमुरडीवर त्याच्याचं  एका नातलगाने बलात्कार केला. सावळाराम शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने खाऊ देण्याचा आमिष देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर मुलीला आरोपीने तिच्या आईकडे नेऊन सोडले .आईला मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून वेगळीच शंका आली. तिने आरडाओरडा करून लोकांना सांगितले .पळ काढत असलेल्या आरोपीला लोकांनी पकडून चोपले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. तिला इजा झाल्यामुळे पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.