बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (10:12 IST)

विलिनीकरण होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरुच राहणार-गुणरत्न सदावर्ते

एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं या आंदोलनात सहभागी झालेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.
सदावर्ते यांनी आझाद मैदानात कामगार संघटनेच्या नेत्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. आम्ही कष्टकऱ्यांचा लढा सुरूच ठेवणार आहोत, असं ते म्हणाले.
एसएसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे. कर्मचाऱ्यांना विनाकारण अटक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे.
दुसरीकडे, राज्यात एसटीची होणारी तोडफोड ही सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासणं गरजेचं असल्याचं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलं. पवारांनी विलीकरणाचा शब्द पाळावा, असंही ते म्हणाले.