गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (09:38 IST)

Jalna Bus Accident : 42 प्रवाशांसह एसटी बस 50 फूट खड्यात कोसळली, अनेक प्रवाशी जखमी

accident
Jalna Bus Accident: जालना जिल्ह्यात एसटी बसचा अपघात झाला असून त्यात अनेक प्रवासी जखमी झाले आहे. हा अपघात पुसद -मुंबई महामार्गावर झाला असून ही घटना मंठा ते वाटरच्या दरम्यान घडली आहे. या एसटी महामंडळाच्या बस मध्ये एकूण 42 प्रवाशी होते. 

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे समजले आहे. एसटीची बस ओव्हरटेक करताना 50 फूट खोल खड्यात पडली. अपघातात काही प्रवाशी जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिस घटनास्थळी उपस्थित झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मंठा शहराच्या पुढे किलडी फाट्याच्या पुलावर घडली आहे. या पुलाचे नवीनीकरण सुरु असल्यामुळे एक मोठा ट्रक या मार्गावर उभा होता. या ट्रकला ओव्हरटेक करताना बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 50 फूट खोल खड्यात पडली. या बस मध्ये एकूण 42 प्रवाशी होते त्यात वृद्धांचा समावेश होता. अपघातात जखमींचा आकडा समजू शकला नाही. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. 
  
Edited by - Priya Dixit