सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (12:36 IST)

जरांगेंचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात

arrest
काल मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. माझा जीवच घ्यायचा आहे न मग मी सागर बंगल्यावर येतो.घ्या माझा बळी. असे म्हणत जरांगे मुबई कडे निघाले असून जालन्यात संचारबंदी लागू केल्यामुळे ते आंतरवली सराटी येथे परत  निघाले. आज सकाळी त्यांच्या 3 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना ताब्यात घेतलं आहे. हे मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जायला निघाले असताना पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली. 

पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा आंदोलन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथे सागर बंगल्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यात कायदा कोणीही हातात हेऊ नये.कायदा  सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit