मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पंढरपूर , शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (10:20 IST)

पंढरीत लाखो भाविक पालख्या दिंड्या दाखल

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा माघी वारी सोहळा होणार असल्यामुळे पंढरपुरात लाखो भाविक पालख्या दिंड्या दाखल झाले आहे. विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पूर्ण उपाययोजना करण्यात आली आहे.
 
विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. तर विठुरायाचे मुखदर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत गेली आहे. या सर्वांना विठ्ठल मंदिर समितीकडून विविध उपाययोजना केल्याची माहितीही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.माघी वारीसाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये चार पोलीस अधिकारी, 35 पोलीस निरीक्षक व शंभर सहाय्यक पोलीस निरीक्षक बंदोबस्तासाठी असणार आहे. तर बाराशे पोलीस कर्मचारी ही माघी वारीसाठी कार्यरत असलेल्या आहेत तर त्याचबरोबर एसआरएफ टीम तयार असणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून माघी यात्रा प्रातिनिधिक स्वरूपाची साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे विठ्ठल व रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी कोरोना नियमांचे पालन करून श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन दिले जात आहे.