बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (19:23 IST)

नवीन वर्ष सेलिब्रेशन नियमावली

पुणे – 31 डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची पुण्यात अंमलबजावणी होणार आहे. 
मार्गदर्शक नियमावली खालीलप्रमाणे
31 डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांनी साधेपणाने आपल्या घरीच साजरे करावे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र जमान्यावर बंदी घालण्यात आली आहे.
31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या निमित्ताने बंदिस्त हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केवळ 50 टक्केच लोक उपस्थित राहतील. तर खुल्या मैदानात कार्यक्रमांना केवळ 25 टक्के लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी मास्क व सॅनिट्झर वापर जरूर करावा.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर 60  वर्षाच्या वरील नागरिकांनी व लहान मुलानांनी सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टीकोनाटाऊन घराच्या बाहेर जाणे शक्यतो टाळावे .
31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी रस्त्यावर, बागेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी जात असताना सॅनिटायझर व मास्कचा वापर बंधनकारक आहे.