शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (15:59 IST)

पार्थ पवार याचं ट्वीट, म्हणाले आत्या काळजी घ्या, तुम्ही दोघे लवकर बरे व्हाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आपल्याला आणि पतीला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. दरम्यान यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ट्वीट केलं असून सुप्रिया सुळेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
“मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या,” असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं होतं. यावर पार्थ पवार यांनी “आत्या काळजी घ्या, तुम्ही दोघे लवकर बरे व्हाल” असं म्हटलं आहे.