मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (15:04 IST)

शेळीने मानवासारख्या मुलाला जन्म दिला, आणि लवकरच...

The goat gave birth to a human-like child
बऱ्याच वेळा आपल्या समोर असे काही धक्कादायक प्रकरणे  समोर येतात, पण असाच एक प्रकार आसामच्या कछार जिल्ह्यातून समोर आला आहे, जो चमत्कारापेक्षा कमी नाही. येथील धौलाई परिसरात एका शेळीने मानवसदृश मुलाला जन्म दिला. मुलाचे दोन पाय आणि कान सोडले तर संपूर्ण शरीर मानवी मुलासारखे होते. मात्र, जन्मानंतर अर्ध्या तासात शेळीचे बाळ दगावले.  हे पाहण्यासाठी लांबून लोक येऊ लागले , शेळी मालकाने सांगितले की, शेळीने मुलाला जन्म देताच त्याला बघून सर्वांनाच धक्का बसला. त्याचा संपूर्ण चेहरा मानवी मुलासारखा होता. शेळीच्या बाळाला शेपूटही नव्हती. ही बातमी पसरताच लांबून लांबून लोक त्याला बघण्यासाठी जमा होऊ लागले आणि त्या चमत्कारिक बाळ बघू लागले. अर्धा तासानंतर हे शेळीचे बाळ मरण पावले तरीही गंगा नगर गावात हा चर्चेचा विषय बनला आहे.