सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (15:49 IST)

नाशिककर ओमायक्रोन लवकरच धडकू शकतो..! जिल्हाधिकारी म्हणाले

नाशिक शहरात या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण जरी अद्याप आढळून आलेला नसला तर खबरदारी घेणे आवश्यक असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सध्या संपूर्ण जग हे ओमायक्रोनच्या भीतीच्या सावटाखाली आहे. अनेक देशात या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने काही देशात लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. भारतात ही रुग्ण आढळून येत असल्याने तज्ज्ञांकडून मोठी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान यावेळी मांढरे म्हणाले की नाशिक शहरात या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण जरी अद्याप आढळून आलेला नसला तरी येत्या फेब्रुवारीपर्यंत देशात ओमायक्रोनचे रुग्ण वाढू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्या तरी यावर एकमेव उपाय म्हणजे नियमांचे पालन करणे आणि लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही अनेक नागरिकांनी लसीकरण केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करणे गरजेचे असून यामुळे ओमायक्रोनचा प्रभाव काहीसा कमी होऊ शकतो. कारण ओमायक्रोन चा पसरण्याचा वेग हा जलद आहे. हे बघता काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचा आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.