1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (15:20 IST)

उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

The winter session of the state legislature begins tomorrow उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात Marathi Regional News  In Webdunia Marathi
ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी उद्या, बुधवारपासून सुरु होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कसोटीचे ठरणार आहे. विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर भाजप विरुद्ध आघाडी सरकार असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
कोरोना प्रदुर्भावाच्या भीतीने सलग दुसऱ्या वर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. २२ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पाच दिवसाच्या अधिवेशनात आघाडी सरकारला घेरण्यासाठी भाजपकडे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असून भाजपच्या हल्ल्याला तोंड देणे आघाडीसाठी आव्हानात्मक आहे. अधिवेशनात ओबीसी आरक्षण, शासकीय भरतीच्या परीक्षा घेण्यात आलेले अपयश, एसटीचा चिघळलेला संप आदी मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे.
 
22 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान अधिवेशन
यंदाच्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरला सुरुवात होणार आहे. 22 ते 28 डिसेंबर या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. कार्यकाळ जरी सात दिवासांचा वाटत असला तरी शनिवार आणि रविवारमुळे हे अधिवेशन अवघ्या पाचच दिवसांचं असणार आहे. हे अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या विविध मुद्यांवरुन राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना सुरु आहे. अशातच आता पुन्हा एकदा सभागृहात ठाकरे आणि फडणवीस आमने-सामने येणार आहेत.